रस्त्याच्या मधोमध एका युवकावर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. यल्लेश कोलकार राहणार आंबेडकर गल्ली मजगाव असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याची उद्यमबाग परिसरात हत्या करण्यात आली आहे.
अनैतिक संबंधातून त्याचा कट काढण्यात आल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. यावेळी घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आणि त्यांनी पंचनामा केला. तसेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला.