शाहूनगर येथील एका इसमाने तीन मजली इमारतीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. शिवाजी बिर्जे वय 65 असे त्यांचे नाव असून ते साई कॉलनी मेन रोड शाहूनगर येथे वास्तव्यास होते.
तसेच ते एन एम सी येथे वॉचमनचे काम करत होते. शिवाजी बिर्जे यांनी आत्महत्या का केली याचे अद्याप निश्चित कारण समजू शकले नसले तरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
तसेच या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविला.