जनतेला खरी माहिती देण्याच्या प्रयत्नात असलेल्या पत्रकारावर हल्ला होत आहेत,हे चुकीचे असून त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
येथील हावेरी मधील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर स्टिंग ऑपरेशन करतेवेळी काहीजणांनी कॅमेरामनवर हल्ला केला. त्यामुळे पत्रकारावर होत असलेले हल्ले रोखण्यात यावेत अशी मागणी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सदर निवेदन बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी या निवेदनात संबंधितांवर कारवाई करावी तसेच पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.