सरकारी मराठी मुलामुलींची शाळा मणतूर्गे येथील शाळा सुधारणा समितीची रचना आज सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी शाळेच्या सभागृहात बिनविरोध पार पडली.
सभेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री ओ. एन. मादार हे होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून प्रल्हाद मादार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी प्रदीप पाटील यांची निवड झाली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून राजाराम पाटील, महेश पाटील, भारत शेलार, गजानन गुरव, धाकलू देवलतकर, सचिन पाटील, तुकाराम देवलतकर, सौ. दिव्या गुंडपीकर, सौ. भक्ती पाटील, सौ. वर्षा जाधव, सौ. प्रियांका पाटील, सौ. वर्षा पाटील, सौ. वैभवी देसाई, सौ. अनुष्का भटवाडकर, सौ. मनीषा देवकरी, सौ. नेहा कानशीनकोप वरील प्रमाणे अठरा पालक सदस्यांची निवड करण्यात आली.
सूचक गणपती गुरव, अनुमोदक सचिन पाटील तसेच सूचक सौ. दिव्या गुंडपीकर आणि राजाराम पाटील यांच्या सूचक व अनुमोदनानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. सदर निवड बिनविरोध करण्यासाठी सुधीर पाटील ग्राम पंचायत सदस्य, गुंडू नामदेव गुरव, ईश्वर बोबाटे, संजय देवलतकर, शांताराम पाटील, परशराम देवलतकर, बाबुराव पाटील, विठ्ठल पाटील आणि नारायण केसरेकर इत्यादींनी सहभाग घेऊन ही निवड बिनविरोध पार पाडली.