खानापूर येथील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या नियती फाउंडेशन बेळगावच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या वाढदिवसानिमित्त आज खानापूर येथे नेत्र तपासणी शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर येथील शिवस्मारकामध्ये या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदादीप आय हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या शिबिरात रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला दिला. याप्रसंगी डॉ सोनाली सरनोबत यांच्यासह बसवराज कडेमणी, बाळेश चवन्नावर, ईश्वर सानिकोप्प, भारती ताकडी, रमेश पाटील, अंजली गुरव, रत्नव्वा मादार, कल्पना गुरव, अर्जुन गावडे आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यात लोकप्रिय असलेल्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपला वाढदिवस समाजाभिमुख साजरा करण्याचा प्रघात पाडला असून याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खानापूर येथील आजच्या नेत्र तपासणी शिबिराचा 200 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला हे विशेष होय.