गेल्या काही वर्षांपासून पावसाला वेळाने सुरुवात होत असल्याने हातात तोंडाला येणारे पीक नाहीसे होत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे पीक भुईसपाट होत आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस हा वेळेवर पडावा याकरिता हनुमान नगर येथील श्री गौळदेव धुपटेश्वर मंदिरात खडक गल्ली चव्हाट गल्ली आणि कंग्राळ गल्ली येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन देवाला गाऱ्हाणे घातले.
यावेळी येथील मंदिरात गौळदेव धुपटेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर ऋतुमानानुसार पाऊस पडावा अशी देवाकडे मागणी करण्यात आली. यावेळी आमदार अनिल बेनके रमाकांत कोंडुसकर शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.