न्यायाधीश गैरहजर, खटला लांबणीवर
न्यायाधीश गैरहजर असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
येत्या 21 सप्टेंबर 2022 रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. म ए समितीच्या वतीने 2017 व 18 साली महामेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्याला परवानगी घेतली नसल्याने म ए समितीच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याची सुनावणी आता सोमवारी होणार होती. मात्र न्यायाधीश गैरहजर असल्याने खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी म ए समितीचे दीपक दळवी प्रकाश मरगाळे मालोजी अष्टेकर माजी आमदार मनोहर किणेकर दिगंबर पाटील निंगोजी हुद्दार यांच्यासह आणखी एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे याप्रकरणी या खटल्याची सुनावणी चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. मात्र आता न्यायाधीश गैरहजर असल्याने या महामेळाव्याच्या दोन्ही खटल्यांची सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे.