उद्या हिंडलगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर शिबिर हिंडलगा येथील ग्रामपंचायत कार्यालयात उद्या बुधवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता पार पडणार आहे.
होनगा येथील डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राच्या वतीने सदर शिबिर हाती घेण्यात आले असून या शिबिरात कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी रक्तदाब मधुमेह या सहनसांशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच त्यांना मोफत सल्ला देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे हिंडलगा उचगाव सुळगा आंबेवाडी या भागातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.