संकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची महालिंगपूर नगरपरिषद येथे बदली करण्यात आली आहे त्यामुळे येथील नगरपरिषदेच्या नूतन मुख्याधिकारी म्हणून राजशेखर चंद्रशेखर चौगुला यांनी सूत्रे स्वीकारली आहेत . यापूर्वीचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची महालिंगपूर नगरपरिषद येथे बदली झाल्याने त्या रिक्त जागी चौगुला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजशेखर चौगुला यांनी काही वर्षांपूर्वी संकेश्वर नगरपरिषदेत आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले होते. नंतर त्यांना पदोन्नती मुख्याधिकारीपदी मिळाल्याने त्यांनी अथणी, ऐनापूर, पिरनवाडी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.
जगदीश ईटी यांची महालिंगपूर नगरपरिषदेत बदली
By Akshata Naik
Previous articleया मोफत शिबिरात तज्ञ डॉक्टर देणार मोफत सल्ला
Next articleया बँकेच्या सभासदांना आवाहन