देशपांडे गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात आला.
यावेळी सकाळी मंदिरात स्वामींना लघु रुद्राभिषेक अभिषेक पंचामृत करण्यात आला.तसेच दांपत्यांच्या हस्ते स्वामींना अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे . तसेच आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली आहे. येथील मंदिराच्या डाव्या बाजूला गुलाबाच्या फुलांनी स्वामींची आकर्षक चित्रकृती रेखाटण्यात आली असून मंदिर देखील फुलांनी सजविण्यात आले आहे .
त्यामुळे भाविक सकाळपासूनच दर्शनाकरिता गर्दी करत आहेत. आता दुपारी 12 वाजता आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे . तसेच आज सायंकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ हा सामूहिक जप करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी या सामूहिक नामजपाला उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर तर्फे करण्यात आले आहे.