आज अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच या पावसाने अनेकांची तारांबळ उडविली.
येथील पांगुळ गल्ली मध्ये पावसाचे आज पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर साचलेले पाहायला मिळाले. तसेच येथील गटार स्वच्छ न केल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर साचल्याने अनेकांना या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागली.
येथील गटारीची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने तसेच अरुंद गटारी असल्याने गटारीतील सर्व सांडपाणी रस्त्यावर साचलेले पाहायला मिळाले.तसेच काही दुकानांमध्ये सांडपाणी शिरल्याने व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागले.
दर पावसातच पांगुळ गल्ली भागात ही समस्या उद्भवत असल्याने या ठिकाणी योग्य उपाय योजना राबवाव्यात आणि गटारीतून सांडपाणी वाहण्याकरिता गटार स्वच्छ आणि रुंद करावी अशी मागणी येथील नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी केली आहे.