होलसेल दराने बापट गल्ली येथे शुभलक्ष्मी सुभाष जाधव या नागमूर्त्या विक्री करण्याचे काम करत आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय चालला असून सध्या त्यांनी या व्यवसायाचा भार आपल्या खांद्यावर एकटीने उचलला आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पासूनच त्यांनी या नागमूर्त्या बनविण्याच्या कामाला लागल्या आहेत. यावर्षी त्यांनी जवळपास 1700 नागमूर्त्या बनविल्या असून त्या होलसेल दराने विक्री करत आहेत ..
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यांनी कमी नागमूर्त्या बनविल्या असल्या तरी खेडोपाड्यातून तसेच कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून मागणी वाढली आहे . 18, 20, 22, 26 या दराने त्या एक नागमूर्ति विक्री करत आहेत.
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण हा नागपंचमी असल्याने सर्वजण आपल्या घरी नागमूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा करतात तसेच त्याला दूध अर्पण करून लाह्याचा नैवेद्य दाखवितात.
नाग्या प्राण्याबद्दल आदर व पुज्य भावना समाजात रुजविण्याकरिता हा सण पाळण्याची परंपरा आहे .नागपंचमी दिवशी सर्वजण घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करतात .तसेच काहीजण नागाचा उपवास धरून नागदेवतेला प्रसन्न करून घेतात. प्राचीन काळी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा ( नागपंचमी ) प्रचारात आली आहे.असे मानले जाते.