No menu items!
Thursday, February 6, 2025

गोरगरिबांचा वैद्यकीय डॉ हरपला

Must read

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेली पाच तप वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या नागनवाडी येथील डॉ. रामचंद्र लक्ष्मण दळवी (वय.८४) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी सहा वाजता निधन झाले.

कोरोनाची पहिली लस एप्रिल 2021 मध्ये घेतल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ते आजारी होते. दुचाकी मोटरसायकल चालवून घरी परतलेल्या डॉ. रामचंद्र दळवी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आणि त्यांचे डोळे अचानक बंद पडले. गेल्या तीन महिन्यापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. बेळगावच्या केएलई रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथे त्यांनी 1967 साली दवाखाना सुरू केला. ते मूळचे मंडोळी गावचे होते.

कानूर अडकुरसह तालुक्याच्या पश्चिम भागातील गावागावातून जावा गाडीवरून फिरून त्यांनी रुग्ण सेवा केली.पाठदुखी, कंबरदुखी,मान विळखण्यावरील उपचारासाठी ते विशेष होते परिचित होते. गोरगरीब रुग्णांची सेवा करताना त्यांनी कधीही आर्थिक गणित सांभाळले नाही. जेवढे गरीब तेवढे त्यांच्याकडे उपचारासाठी येत होते. गेल्या पाच तपातील गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर रामचंद्र दळवी यांच्या निधनाने पंचक्रोशीत अवकळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे,दोन भाऊ, चार बहिणी, असा परिवार आहे. दैनिक तरुण भारतचे चंदगड तालुका प्रतिनिधी विजयकुमार दळवी आणि नागनवाडी येथील डॉक्टर अजयकुमार यांचे ते वडील होत.त्यांच्या पार्थिव देहावर नागणवाडी येथे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!