श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक बैठक रविवार दि. 24/7/2 रोजी श्री घनशाम जोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी 2021 साल च्या जमा खर्चाला मंजूरी देण्यात आली. तसेच 2022 गणेशोत्सव बद्दल नियोजन करण्यात आले.
यावेळी 2022 सालाची नविन कार्यकरणी निवड करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष – प्रथमेश अष्टेकर ,उपाध्यक्ष अमर कुरणे ,खजिनदार घनशाम जोशी ,सेक्रेटरी विनित हणमशेठ ,कार्याध्यक्ष विशाल गोंडे, शाम नाकाडी यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिल्पा केकरे, कुशन केकरे, श्रेयश बाळकुद्री, विवेक महांत शेट्टी, आदित्य कुरणे, अनिल श्रीरंग शेट्टी, प्रविण बैलूर, प्रशांत बैलूर, सुनिल नागरे, प्रसाद विस्ती यांच्यासह कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.