खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नड सक्ती विरोधात आणि मराठी परिपत्रके मिळविण्यासाठी ९ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे.
सदर बैठकीत १८ जुलै रोजी झालेल्या रास्तारोको आंदोलनाच्यावेळी माननीय तहसीलदारांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी तहसिलदारांची भेट घेणे तसेच खानापूर सरकारी इस्पितळात कन्नड सोबत मराठीत देखील फलक लावण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे.
त्याचप्रमाणे कस्तुरीरंगन अहवाल मार्फत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तालुक्यातील ६० गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत विचार विनिमय करण्याचे ठरविले आहे. तरी तालुक्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी कळविले आहे.