दिव्यांग कल्याण खात्याकडून दिव्यांगांना दुचाकी वाहन वितरण करण्यात येणार आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि निपाणी मतदार संघातून कमी अर्ज आले आहेत. यापूर्वी अर्जासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र सदर मतदार संघातून कमी अर्ज आल्याने पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. दि. १६ ऑगस्टपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे कळविण्यात आले आहे