वडगाव येथील महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज समोर हा अपघात घडला असून या अपघातात मुस्लिम महिला जागीच ठार झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सदर महिला दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून जात होती .यावेळी भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रॅकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेली महिला खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली आहे