तानाजी गल्ली ओल्ड पी बी रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा चौकट पूजन आज करण्यात आले .सध्या या मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू असून आज चौकट पूजन करण्यात आले.
ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले,अभियंता प्रवीण अप्पन्नवर
यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले.
श्री रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे .या ठिकाणी सुंदर बांधकाम आणि सजावट करण्यात येणार आहे .दानशूर भाविकांच्या आर्थिक मदतीतून मंदिराचे सौन्दर्यीकरण करण्यात येत आहे .तरी इच्छुकानी मंदिराच्या जिर्णोद्धारात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रारंभी श्री रेणुका देवी मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष राहुल मुचंडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी चंद्रकांत कामुले, यल्लाप्पा पाटील, बेकवाडकर, बाळू लोहार,सुभाष मजुकर यांच्यासह तानाजी गल्ली, समर्थ नगर परिसरातील महिला कार्यकर्ते आणि श्री रेणुका देवी भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.