आता अधिकृत सरकारी बाजारपेठेतून भारतीय ध्वज फक्त रु. 25 मध्ये खरेदी करता येणार आहे . हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून, पोस्ट खात्याने ePostoffice पोर्टल –www.indiapost.gov.in द्वारे राष्ट्रीय ध्वजांची ऑनलाइन विक्री जाहीर केली आहे.
या विभागाने “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय ध्वजांची विक्री त्याच्या ePostoffice पोर्टलवरून प्रस्तावित केली आहे.
ग्राहक या पोर्टलवर ऑर्डर करून आणि पेमेंट करतील ,तसेच ध्वजांची डिलिव्हरी जवळच्या पोस्ट ऑफिसमधून केली जाईल जिथे झेंडे उपलब्ध असतील, ”टपाल विभागाने एका अंतर्गत आदेशात असे सांगितले आहे.
“ईपोस्ट ऑफिस पोर्टलद्वारे राष्ट्रीय ध्वजाची विक्री आणि वितरण 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाले आहे,” असे विभागाने म्हटले आहे.
तसेच एकदा ऑर्डर दिल्यानंतर, रद्द करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पेमेंटची खात्री झाल्यानंतर जवळच्या पोस्ट ऑफिसद्वारे ध्वजाची डिलिव्हरी ग्राहकांना मोफत केली जाणार आहे
स्वातंत्र्य दिनापूर्वी कमीत कमी वेळेत झेंडे पोहोचवण्याचे आदेशही विभागाने पोस्ट ऑफिसांना दिले आहेत.तसेच भारतीय ध्वजांच्या व्यतिरिक्त, इंडिया पोस्ट त्याच्या अधिकृत वेबसाइटवर इतर उत्पादने जसे की गंगाजल, एलपीओ, फिलाटली वस्तू इत्यादी विक्री करत असून आता राष्ट्र ध्वज देखील विक्री करणार आहे