आठ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून जोमाने धरणे आंदोलन यशस्वी करूया असा अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी निर्धार केला .
खानापूर एम ए समितीची बैठक आज शिवस्मारक खानापूर या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये तालुक्यामधील मराठी विभागामध्ये विभागीय बैठका घेऊन आठ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाची जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मध्यवर्ती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन होणार आहे
या आंदोलनात खानापूर तालुक्यामधून मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी गावामध्ये जाऊन जोमाने जागृती करण्याचे ठरवण्यात आले यावेळी जनजागृती विषयी कार्यकारणी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली व तालुक्यातील इतर समस्या बद्दल साधक बादक चर्चा करण्यात आली यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव गोपाळ पाटील पी एच पाटील सूर्याजी पाटील रवींद्र पाटील पांडुरंग सावंत रवींद्र शिंदे रणजीत पाटील राजीव पाटील बळीराम पाटील युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील अनंत झुंज वाडकर ज्ञानेश्वर सनदी किशोर हेबाळकर आदी उपस्थित होते