No menu items!
Monday, December 23, 2024

जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन – डॉ. एन टी. मुरकुटे

Must read

चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुरुमाऊलींचा सत्कार

कार्वे –
वाचन हा एक छंद आहे तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात. जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय . असे प्रतिपादन यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. एन.टी. मुरकुटे यांनी केले .
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत आयोजित इयत्ता दहावी परीक्षेतील मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मराठी विषय शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ. मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले . पाहुण्यांची ओळख सीमाकवी रवी पाटील यांनी करून दिली.प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले शालेय समितीचे अध्यक्ष एम. एम. तुपारे उपस्थित होते . त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक सुरेश सातवणेकर , डी. ए. सातर्डेकर , ए. झेड. गावडे , पी. बी. चौगुले , सतिश बोकडे , माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे , माजी प्राचार्य आर. आय. पाटील यांचा शाल ,श्रीफळ ,स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला . तर मराठी विषयात ९६ पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या तालुक्यातील पंधरा विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह ,प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले .

यावेळी एम. एम. शिवणगेकर ,टी. टी. बेरडे , एस. एल. बेळगावकर , एम. टी. कांबळे , आर.आय. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला महादेव भोगुलकर , सुरेश तुर्केवाडकर , जी. व्ही. गावडे , एस.पी. पाटील , व्ही. एल . सुतार , एस. पी. मोहनगेकर ,सुरेश नाईक , पी. के. पाटील , डी.एस. धुमाळे , देसाई सर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी तर आभार बी.एन. पाटील यांनी मानले .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!