उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या, 1991-92 च्या, 7 वी च्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या योगदानातून, या वर्षात एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शाळेचा सर्वांगीण विकास या एकाच ध्यासापोटी, एक सुरुवात म्हणून शाळेच्या दोन वर्गांना पुरतील अशी 35 बैठक आसने (डेस्क) विद्यार्थ्यासाठी आणि काही पुस्तकांचा संच शाळेच्या वाचनालयाला देणगी स्वरूप सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमासाठी त्यांना सध्या कार्यरत तसेच माजी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आणि माजी विद्यार्थ्यांचे समर्थन व अर्थसहाय्य लाभले.
माजी शिक्षिका/शिक्षक: कुंभार टीचर, तरळे टीचर, नातू टीचर, बेकवाड टीचर, हंडे सर आणि बेळगुंदकर सर तसेच सध्याच्या मुख्याधिपिका गुरव टीचर यांचे मार्गदर्शन लाभले आणि या बॅच मधील शाळेचे उचगावचे माजी विद्यार्थी : दीपक विठ्ठल नवार, उमेश लक्ष्मण चोपडे, महेश रामकृष्ण हुक्केरीकर, विनोद मारुती होनगेकर, उमेश लक्ष्मण शिंदोळकर, किरण गोपाळ पावशे, नरसिंग अनंत देसाई, महादेव खाचो पाटील, प्रभाकर लक्ष्मण पावले, बाळू खाचो कदम, यल्लाप्पा मल्लाप्पा तुपारे, लक्ष्मण शिवाजी कोवाडकर, विजय मनोहर देसाई, भैरू मारुती नेसरकर, संदीप मारुती पावशे, ज्योतिबा रामा चौगुले, गुंडू रामा चौगुले आणि माजी विद्यार्थिनी: वीणा निवृत्ती पावले, अक्काताई महादेव पाटील, कांचन देवाप्पा नेसरकर, नीता गावडू पाटील, लक्ष्मी नाना जाधव, सुलोचना वसंत बांदिवडेकर, सरोजिनी नारायण देसाई, शैला विश्वास चव्हाण, अश्विनी यशवंत देसाई, अंजलिन आंद्रु फर्नान्डिस, सुनीता परशराम चौगुले, तसेच शाळेचे बसुर्ते गावचे माजी विद्यार्थी: शंकर बसवंत बेनके, लक्ष्मण रमेश घुमटे, प्रकाश बाळू तरवाल, नामदेव गुंडू केसरकर, लक्ष्मण रामा मोदगे, सुधाकर तानाजी पाटील; या सर्वांच्या भरभरून आर्थिक सहाय्यातून हे कार्य सिद्ध झाले.