लाल दिव्याच्या गाडीतून सर्व अधिकारी फिरत असतात मात्र बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चक्क दुचाकीवरून शहराच्या दौरा केला आहे.
त्यांनी या दौऱ्याद्वारे गणेशोत्सवाच्या काळात करण्यात येणाऱ्या विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली असून रस्ते देखील सुसज्ज आणि सुस्थितीत आहेत का याची देखील पाहणी केली आहे.
गणरायाचे आगमन येत्या दोन दिवसात होणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी गणरायाचे मुक्काम झाल्यानंतर विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा याकरिता त्यांनी सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता दुचाकीवरून शहराचा फेरफटका मारून शहानिशा केली आहे.
तसेच कोणत्या जागी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात आणि कोणत्या दक्षता घ्याव्यात याही त्यांनी सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी विसर्जन्यवस्थेसाठी योग्य दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या असून श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर कपिल तलाव येथे परिसरात योग्य विद्युत व्यवस्था करण्याची सूचना देखील प्रशासनाला केली आहे.
त्याचबरोबर विसर्जन तलावाच्या स्वच्छतेचे काम देखील हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्याच्या रंगरंगोटीचे काम देखील उद्यापर्यंत पूर्ण करण्याची सूचना देखील केली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत पाहणी दरम्यान मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.