आप पक्षाच्या वतीने खानापूर उपतहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे .या निवेदनात आपच्या कार्यकर्त्यांनी खानापूर नंदगड आणि पारिश्वाड भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी जादा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी खानापूर नंदगड आणि पारिश्ववाड येथील सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर सातत्याने गैरहजर असल्याचे सांगितले आहे त्यामुळे या सर्वांना लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेकरिता हजर राहण्याकरिता नोटीस बजावण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
खानापूर हा भाग दुर्गम असल्याने या ठिकाणी अनेक डॉक्टरांचे नियुक्ती करणे गरजेचे आहे मात्र असे न झाल्याने येथील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तसेच डॉक्टर सुद्धा सातत्याने गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे
त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून डॉक्टरांना त्वरित त्यांच्या नियुक्तीच्या जागे रुजू होण्याच्या आदेश बजाविण्याची मागणी या निवेदनानाद्वारे केली आहे जर असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आपने दिला आहे.
यावेळी आप या पक्षाचे तालुकाध्यक्ष भैरू पाटील, शंकर हेगडे दशरथ भानुशी लबीब शेख चंद्रकांत मेदार मोहन मलिक शिवाजी गुंजीकर गोपाळ गुरव राम गावडे राजु टोपणनावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते