बेळगांव परिसरातील गावामध्ये जनावरांना होत असलेल्या महाभयंकर लिम्पिस्कीन नावाचा वायरल इन्फेकशन सध्या मोठ्या प्रमाणात फैलावत आहे .यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी व उपाय योजना यासाठी व स्वच्छता कशी राखावी यासाठी बेळगांव ग्रामीण चे माजी अध्यक्ष व मराठा नेते विनय विलास कदम व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ प्रताप हन्नूरकर यांनी ग्रामपंचायत आंबेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन जनरल सेक्रेटरी राहुल भातकांडे, आंबेवाडी गावातील भाजप कार्यकर्ते खाचु तरळे ,प्रमोद तरळे, डॉ सचिन तरळे, अरुण सांब्रेकर, विकास भातकांडे ,प्रेम तरळे, दयानंद होनगेकर, मंजुनाथ कांबळे, सचिन शहापुरकर, नंदू तरळे ,राजू सांब्रेकर, शंकर सांब्रेकर ,उमेश चौगुले, दिनेश बोगार ,संतोष लोहार ,विक्रम यलगुकर ,लक्ष्मण चौगुले व श्री राम युवक मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते.