आज पहाटे के एस आर पी मच्छे जवळ एका तरुणाचा भीषण अपघात झाला. जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक होती.तसेच त्याला कोणीही मदत करण्यास तयार नव्हते .
यावेळी माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि त्यांच्या पत्नी श्मारिया मोरे यांनी या तरुणाला पहिले आणि त्यांनी त्याला तातडीने वेणुग्राम रुग्णालयात हलवले. याप्रसंगी डॉक्टर, परिचारिका यांनी त्याच्यावर उपचार केले तसेच मच्छे येथील तरुणांनी त्यांना चांगला पाठिंबा दिला तसेच आता अपघातात गंभीर झालेल्या युवक धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .