मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील पडझड झालेल्या शाळा इमारतीची केंद्रीय अभ्यास पथकाने आज शनिवारी पाहणी केली.
केंद्रीय अभ्यास पथकाने गर्लगुंजी येथील शाळेच्या प्रत्येक वर्गाला भेट देऊन पडझडीचे निरीक्षण केले. तसेच शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांकडून आवश्यक माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., उपविभागाधिकारी रवींद्र कर्लिंगनावर आदी उपस्थित होते. प्रारंभी या सर्वांचे उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. शाळा पडझडीच्या पाहणीनंतर अधिकारीवर्गाने गव्हाच्या उप्पीटाचा आस्वाद घेतला.