सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आयोजन
जायंट्स सप्ताहानिमित्त १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान जायंट्स सखीने महिला आणि विद्यार्थिनींसाठी विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित केल्या असून यावर्षी जायंट्स इंटरनॅशनल या जागतिक संघटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी या स्पर्ध भव्य प्रमाणात घेण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त महिला आणि मुलीनी यात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये १) वेशभूषा (खुला गट) तयार होऊन शूटिंग करून व्हिडिओ पाठविणे, वेळ- एक मिनीट संपर्क सुलक्षणा शिन्नोळकर मो. ०८३१०८०८५६१ २) (खुला गट) – नृत्य स्पर्धा ही मोबाईलवर शूटिंग करून पाठवायची आहे. वेळ- दोन मिनिटे, संपर्क- ज्योती अनगोळकर, मो. ९९००८३३५६७. ३) वक्तृत्व स्पर्धा (खुला गट) – वेळ – दोन मिनिटे, विषय- अ) मोबाईल आणि आजची पिढी ब) माझे बालपण क) दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर संपर्क- चंद्रा चोपडे, मो. ८०९५५१४५८६ ४) केशरचना (हेअर स्टाईल) वयोगट २० च्या पुढे, केशरचना करतानाचा व्हिडिओ पाठविणे, वेळ- दीड मिनीट, संपर्क- ज्योती सांगूकर, मो. ९१४८८३२३३५. ५) गायन स्पर्धा गायन स्पर्धा ही मोबाईल वर शूटिंग करून पाठवायची असून त्यासाठी वेळ दोन मिनिटांचा आहे. संपर्क- निता पाटील ८८६१४९७०९४ आलेल्या स्पर्धकांच्या वयोमानानुसार गट ठरवून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि सचिव सुलक्षणा शिन्नोळकर याच्याशी संपर्क साधावा.असे कळविण्यात आले आहे