माता सरस्वती देवी ह्या केवळ भारतालाच नव्हे तर विश्वाला वंद्य आहेत. विद्येची देवता म्हणून पूज्य आहेत. त्यांचा अपमान हिंदू समाज कदापी सहन करणार नाही. स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी समाजात भेद निर्माण व्हावा व आपले विकृत ध्येय साध्य व्हावे याकरिता केलेले हे कृत्य दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
कोणताही सबळ पुरावा नसतांना कल्पोकल्पीत वैचारिक प्रदर्शन देशासाठी व समाजासाठी घातक आहे. यातून माजी मंत्री छगनराव भुजबळांनी आपल्या वैचारिक दारिद्रतेचाच परिचय दिला आहे असे आमचे ठाम मत आहे. आमची आता ही धारणा होते आहे की ते कधी शाळेत गेलेच नसतील. गेले असते तर त्यांना माता सरस्वतीची थोरवी कळली असती. यातून त्यांना इतिहासाचेही अज्ञान आहे असे दिसते आहे.मैत्रेयी गार्गी.पासून तर अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाबाई पर्यंत आणि आधुनिक काळातही स्त्री शिक्षण हिंदू संस्कृतीत होते याचा क्षुद्र स्वार्थासाठी विसर पडलेला यातून दिसतो. सावित्रीबाई फुले यांनी माता सरस्वतीचे मंदिर मुलींसाठी खुले झाले आहे असे बोलल्याचा व आपल्या पुस्तकात लिहिल्याचेही त्यांनी नाकारत सावित्रीबाई फुले यांचेसह सर्व स्त्री जातीचा अपमान केला आहे याचा आम्ही तिव्र निषेध करतो व शासन आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी करतो.
ज्यांनी माता सरस्वतीच्या नावाखाली शिक्षण संस्था उभारून शासनाच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्या. पैशाचा अपहार केला. स्वतः आरोपी असून जामिनावर बाहेर आहेत. देशद्रोही कृत्यांसाठी जेलमध्ये असणाऱ्या माजी मंत्र्यांशी संगनमत करून देशद्रोही नुकतीच बंदी घातलेल्या संघटनेला सोबत घेऊन हिंदूंचे दमन केले कोविड काळात प्रचंड आपहार केला अशा विश्वासार्हता गमावलेल्या व्यक्तीने केलेले हे कृत्य विलक्षण संतापजनक आहे
सरकारने अशा गोष्टींना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे नाहीतर राज्य अंतर्गत कलहाने ग्रस्त होईल व कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
धार्मिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना म्हणून विश्व हिंदू परिषद देवदेवतांचा अपमान कदापि सहन करणार नाही तसेच भारतमातेवर श्रद्धा असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याचीही काळजी आम्ही घेणारच शासन व प्रशासनानेही पुढाकार घेऊन यालर तातडीने पायबंद घातला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.
यावेळी निपाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत निपाणी तहसीलदार श्री प्रवीण कारंडे यांना निवेदन देताना श्री अजित पारळे , सनातन संस्थेचे साधन श्री जुगलकिशोर वैष्णव, आतिश चव्हाण, राजेश पूरंत, बबन निर्मले उपस्थित होते.