सरकारी मराठी शाळा नं 2 गणपत गल्ली बेळगाव याठिकाणी आज महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी स्वचछता आंदोलन , गुरूजनांचा सत्कार , विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण व एक हात मदतीचा या उपक्रमा अतंर्गत मानिक कुरिया याला संगणक वितरण असा भरगच्च कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व अस्मा नाईक यांनी प्रार्थना सादर केली. दिपप्रज्वलन व फोटोपूजन श्रीमती भारती दासोग व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित भाषणे , गीत व रघुपती राघव राजाराम हे भजन सादर केले.त्यानंतर सर्व समस्त शिक्षकाच्या वतीने
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती सुशीला गुरव जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती विद्या पाटीलशाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन राष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेले श्री राजेन्द्र भंडारी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित श्रीमती भारती दासोह प्राध्यापिका शहर अध्यक्ष श्री बाबू सोगलन्नावर , संघाचे प्रतिनिधी श्री सुनिल देसुरकर, अस्मा नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रममध्ये प्रतिभा कारंजी स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत शिक्षक बंधू भगिनी व इतरमित्रमंडळी कडून जमा झालेल्या मदतनिधी मधून आगीच्या दुर्घटनेत फोटोग्राफी शॉपचे नुकसान झालेल्या नंदगड येथील मानिक कुरीया यांना व्यवसाय पुर्नउभारणीसाठी उत्तम दर्जाचा संगणक वितरण कार्यक्रम संपन्न झाला
शेवटी मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी सिंधू पाटील , जयश्री पाटील , जैनोजी सर , मनिषा लाड, मंजुळा कामत , सतीश पाटील सर, उत्तुरकर सर , पाखरे सर , ए.एल.हुनसे., कल्पना कुलकर्णी सांबरेकर सर , ईतर शिक्षक , शाळा एसडीएमसी अध्यक्ष गजानन ठोकणेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विश्वनाथ पाटील , प्रास्ताविक जैनोजी सर व आभार प्रदर्शन सिधू पाटील यांनी केले.