बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व भारतीय वायुसेनेचे अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तायक्वांडो मास्टर श्रीपाद रवी राव यांचे देखरेख खाली काकती येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांचे जयंती निमित्त राव युवा अकादमीने रविवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी ०३ किलोमीटरचे ‘फिट इंडिया फ्रीडम् रन ३.० चे अंतर्गत फिट काकती रन’ आयोजन केला होता.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांडो खेळाडूं अथर्व मोरबाळे, स्तुती टुमरी, श्रेयसगौडा गोवरी, विहानी हुंद्रे, आदित्य भट्ट, स्वयं गिरी, विवान सिंग, त्रिशा मानव, आनीक रहमान, वियान सरकार, गगन शिवपूजीमठ, त्रिशा पनेरू, वेदांत खडबडी आरुष टुमरी, मोहम्मदशफी चंदशाह, मोहम्मदशोयेब चंदशाह, पवनराज दड्डीकर, सिद्धरतगौडा गोवरी, श्रीराज पाटील, कोमल बेटगेरी, स्पर्श भोसले, श्रेयश मोदगेकर, अवनी ऋतकुटे, सुम्मय्या पाचापुरी, सान्वी पाटील, जाफरसादिक पाचापुरी, जिया पुजारी, त्रिवेणी बडकन्नवर, श्रेया अतिवाडकर, जितेश पुजारी आदीने दैनंदिन जीवनात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पसरण्यासाठी हा पुढाकार घेतला. ग्रामवासीयांना दररोज किमान २० ते ३० मिनिट शारीरिक व्यायामात सहभागी व्हा असा पुकार या खेळाडूंनी घेतली.
राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे शारीरिक प्रशिक्षक व क्रीडा निर्देशक जगदीश गस्ती यांनी खेळाडूंचा हा उपक्रम चा प्रशंशा केले, तसेच बेळगाव जिल्हा तायक्वांडो चे अध्यक्ष अडवोकेट प्रभाकर शेडबाळे व सचिव महादेव मुतनाळे यांनी येणारी दिवसात असला उपक्रम जिल्ह्यच सर्व तालुक्यातील घडवली जाईल असं कळविले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय तायक्वांडो पंच स्वप्नील पाटील व वैभव पाटील यांनी संयोजन केले तसेच काकती ग्रामस्थ संदेश पाटील, महेंद्र सिंग, दर्शन होंगलकर व काकती सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.