23 ऑक्टोबर रोजी देशपांडे गल्ली येथील कावेरी ऑटोमोबाईलच्या दुकानात चोरीचा प्रकार घडला होता. त्याच दुकानात काम करणाऱ्या कामगारांने रोकड व स्पेअर पार्ट पळविल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी एका राजस्थानी कामगाराला अटक करून त्याच्या जवळून अडीच लाखांचा ऐवज जप्त केला शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
येथील मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोर्ट रोड देशपांडे गल्ली येथे एका कावेरी ऑटो मध्ये काम करणारा व्यक्तीने दुकानातील किमती साहित्य चोरले होते.
यावेळी त्याच्याविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक 172/2022 भांदवी कलम 381 अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत महाराष्ट्र राज्याच्या मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आरोपीचा माग काढला.
आणि त्याच्या जवळून मोबाईल दुचाकी मौल्यवान वस्तू यासह दोन लाख 24 हजार 791 रुपये जप्त करत आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले.
सदर कारवाई वरिष्ठ अधिकारी एन व्ही बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय मालिका अर्जुन तुळशी गिरी शशी कुमार कुरळे शिवपाथेली यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. सदर कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.