बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित मेजर ध्यानचंद चषक सिक्स ए साईड आंतरशालेय हॉकी स्पर्धा रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी मेजर बी. ए. सय्यद हॉकी मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली नावे संघटनेचे सचिव साकिब बेपारी किंवा गोपाळ खांडे यांच्याकडे नोंदवावीत. मुलांसाठी इ. ७ वी पर्यंत गट, ८ वी ते १० वी गट तर मुलींसाठी १० वी पर्यंतच्या गटात स्पर्धा घेण्यात येणार रविवारी सकाळी ८ वा. या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, सर्व संघानी वेळेवर उपस्थित रहावे.असे कळविण्यात आले आहे .