एंजल फाउंडेशन च्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅली चे आयोजन केले आहे.
या रॅली मध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच स्पर्धेचे काही नियम नियम आहेत .
१) या स्पर्धेत१८ वर्षे पूर्ण असलेली कोणतीही दुचाकी चालक महिला सहभागी होवू शकते.
२) स्पर्धकाने पारंपारिक वेशभूषा परिधान करणेची आहे .
३)बुलेट दुचाकीसाठी वेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
४) स्पर्धेत मोफत प्रवेश आहे
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
बाईकरॅलीचा मार्ग धर्मवीर संभाजी चौक , किर्लोस्कर रोड,रामदेव गल्ली,खडे बाजार,गणपत गल्ली, मारुती गल्ली, गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड,चन्नमा सर्कल,सरदार ग्राउंड हा असेल. स्पर्धेचा बक्षीस समारंभ महिला विद्यालय येथे होणार आहे. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके उपस्थित असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांक रु.५०००/-,
द्वितीय क्रमांक रु.३०००/-,
तृतीय क्रमांक रु.२०००/-,
उत्तेजनार्थ रु.१०००/-,
बुलेट दुचाकी साठी विशेष बक्षीस दिले जाणार आहे.