बेळगाव शहरातील आयसीएससी प्रमाणित महाविद्यालय ज्ञान प्रबोधन मंदिर यावर्षी आपला रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा करत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक पाच रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेच्या आवारात होणार आहे. या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ज्ञान प्रबोधन मंदिरच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे काम सुरू आहे. गेल्या 25 वर्षात या शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले असून रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आनंद सोहळा ही शाळा साजरा करणार आहे.