बेळगांव. महाराष्ट्र राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मंगळवार, 6 डिसेबर रोजी बेळगावला येत आहेत. या भेटीत ते सीमावसियांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्यासमोर मराठी पत्रकारांच्या समस्या आपणाला मांडावयाच्या आहेत. याकरिता मराठी पत्रकारांची बैठक शनिवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बोलाविण्यात आली आहे. कुलकर्णी गल्ली येथील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. सर्व पत्रकारांनी हजर राहावे, असे आवाहन विलास अध्यापक आणि कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.