राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र यांचे सहकार्याने ऑननरी कॅप्टन आबा पाटील फॉउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील यांनी राज्यस्तरीय पुरस्कार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारन व्यक्तीनी केलेल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणून तसेच जागतीक दिव्यांग दिनाचे औचित्य राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे जाहिर केला आहे.
त्यानुसार त्यांनी खानापूर येथील पुंडलिक कुंभार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .दिव्यांग असूनही दिव्यांगत्वावर मात करून पॉटरी व्यवसायात भरारी घेणारे व आपल्यासह १० अपंगांना व्यवसायात सोबत घेऊन व्यवसाय करणारे बेळगांव-खानापूर येथील पुंडलिक कुंभार यांना दिव्यांग व्यावसायीक आंतर राज्य पुरस्कर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
यापुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व पुष्पगुच्छ दअसे असणार आहे .सदर पुरस्कार हा त्यांना कै आबा पाटील फौंडेशन तर्फे देण्यात येणार असून त्यांना मिळणाऱ्या या पुरस्काराबद्दल त्यांचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे