तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री मंजुनाथ नायक यांचा आज खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष,पांडुरंग पाटील,कार्याध्यक्ष लक्ष्मण बामणे, खजिनदार, डी एम भोसले सर, सेक्रेटरी अमोल बेळगांवकर, अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे सदस्य हणमंत गुरव, आबासाहेब दळवी सर,सुरेश पाटील कौंदल, निवृत्ती पाटील, मरू पाटील, चंद्रकांत बरुकर, गोपाळ गेजपतकर हे उपस्थित होते.