राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चलो सुवर्णसौध ची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नाटक क्षत्रिय मराठा समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चलो सुवर्णसौध मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमाला आज शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी चलो सुवर्णशोध आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
चलो सुवर्णसौध आंदोलना संदर्भात यावेळी माहिती देताना फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड म्हणाले, बेळगाव राज्य विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला अलीकडे विविध आश्वासने दिली आहेत. त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे.मराठा समुदायाला सध्या इतर मागास वर्ग ३ ब असे आरक्षण आहे.मात्र त्यांचा इतर मागास वर्ग २ ए मध्ये समावेश करण्यात यावा. अशी प्रमुख मागणी मराठा फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात कर्नाटक मराठा फेडरेशनच्या वतीने बेंगलोर आणि दिल्ली येथे विविध मान्यवर नेत्यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेध वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा फेडरेशनच्या वतीने चलो सुवर्णसौधची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या चलो सुवर्णसौध आंदोलनाची जनजागृती केली जात आहे बेळगाव शहर बेळगाव तालुका खानापूर संकेश्वर निपाणी चिकोडी अथणी जमखंडी गोकाक रामदुर्ग येथे चलो सुवर्णशोध जनजागृती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आंदोलनाला यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले फेडरेशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार मनोहर कडोलकर,उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सकल मराठा अध्यक्ष किरण जाधव, निपाणीच्या सुमित्रा उघळे, युवा नेते विनय कदम यांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त करून, चलो सुवर्णसौध आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी बेंगलोर महानगर अध्यक्ष रविशंकर महाडिक, जिल्हाध्यक्ष वैभव कदम,निपाणीचे विठ्ठल वाघमोडे, लोकूर पंचायत सदस्य पिंटू चव्हाण, गणपत पाटील, सारंग देसाई, महेश रेडेकर, परशुराम कडोलकर, बंडू कुद्रेमनीकर, ईश्वर शिंदे,पप्पू कदम, राहुल भातकांडे, सुमित कोल्हे,नारायण झंगरूचे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते