शहर परिसरा बरोबरच उपनगरी भागातील दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी सकाळपासूनच महाराजांना अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले.
येथील कडोलकर गल्लीमध्ये दत्त जयंती निमित्त मंदिराची फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली होती तसेच मंदिरासमोर आकर्षक मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
तसेच सकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील पार पडला. तसेच आता सायंकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी दत्तप्रकट दिन साजरा करण्यात येणार असून आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे.