पतंजली योग समिती बेळगाव यांच्यावतीने एक दिवशीय विशेष मोफत योग शिबिराचे आयोजन केले आहे.रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी पाच ते सात या वेळेत हे योग शिबिर पार पडणार आहे.येथील लिंगराज महाविद्यालय मैदान येथे पतंजली योग समिती महिला पतंजली योग समिती भारत स्वाभिमानी ट्रस्ट युवा भारत आणि किसान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे योग शिबिर पार पडणार आहे
या योग शिबिराला हरिद्वार येथील आचार्य चंद्रमोहन जी पूजस्वामी परमार्थ देवजी आणि सचिन जी यांची मुख्य उपस्थिती असणार असल्याची माहिती यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी भवरलाल आर्य यांनी दिली.
याप्रसंगी महिला राज्य प्रभारी उत्तर कर्नाटका आरती कानगो मंडळ प्रभारी किरण मनोळकर जिल्हा प्रभारी पुरषोत्तम पटेल जिल्हा प्रभारी मोहन बागेवाडी उपस्थित होते.