महिलांनी आर्थिक सामाजिक यासह प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचे मत उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. ते अयोध्या नगर येथील श्री अयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
सदर कार्यक्रम अयोध्या नगर येथील डॉक्टर रवी पाटील यांच्या कॉलेजच्या सभागृहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार अनिल बेनके, विजय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवी पाटील , माजी नगरसेविका जयश्री माळगी, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव सुभाष पाटील उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने महिला मंडळाच्या सदस्यांनी केली. त्यानंतर गणेश लक्ष्मी आणि सरस्वती फोटो पूजन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून मंडळाच्या फलकाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले .
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना डॉक्टर रवी पाटील यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले तसेच अयोध्या नगर याप्रमाणेच येथील मंडळाला सुद्धा आयोध्या नाव हे मिळाल्याने त्यांचे कौतुक करून मंडळाला कोणतेही मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
त्यानंतर माजी नगरसेविका जयश्री माळगी यांनी उपस्थित महिला मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी महिलांनी कशाप्रकारे पुढे यावे एकमेकांना सहकार्य करून आपल्या संघाचे नाव पुढे कसे आणावे याबद्दल सांगितले. तसेच दुसऱ्यांच्या घरी जिजामाता नाही तर तुम्ही तुमच्या घराच्या स्वतः जिजामाता बना असा सल्ला दिला.
त्यानंतर दिवाळी मध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी पार पडला .यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .
यावेळी अध्यक्षीय भाषण भारती किल्लेकर यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळाच्या उपाध्यक्ष वनश्री भातकांडे यांनी केले. यावेळी अयोध्या नगर येथील श्री अयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या महिला तसेच येथील नागरिक या महिला मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते.