बेळगाव भागात पिकणारी मसूर नामांकित म्हणून ओळखली गेल्याने ती देशात तसेच परदेशातही चवीचा मोह आहे.त्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक व इतर राज्यातील व्यापारी बेळगावमधे येऊन मसूर खरेदी करुन घेऊन जात आहेत .
गेल्यावर्षी व यावर्षी रब्बी हंगाम खराब हवामानाने मसूर पीकं अत्यल्प तर अनेक शेतकऱ्यांना बियाणे पूरतेही मिळाले नाही. यावर्षी मसूरवर मर रोग पडल्याने मसूरवर शेतकरी औषध फवारणी करुन थकले.पण पूढच्या वर्षी पेरण्यापूरतीतरी मसूर मिळण्याची चिन्हे धूसर झाली आहेत.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी 300/350 रु किलोने खरेदी करुन एकरी 30/40 किलो पेरली आहे.त्यात पडलेल्या रोगाने हताश झाला आहे.पण मधे वरे म्हणून पेरलेली मोहरी बहरलेली व काळा वाटाणा मात्र बहरलेले पाहून थोडा दिलासा मिळाल्याने कांही अंशी शेतकरी समाधानी झाला आहे.