2022-23 हे महिला विद्यालय शाळेचे शतक महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्ताने 2002 च्या बॅचने रविवार दि 25 डिसेंबर 2022 रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ‘हीच अमुची प्रार्थना’ या प्रार्थनेने व शालागीताने झाली. कार्यक्रमात व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष श्री मधुकर परांजपे, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा आपटे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही.एन.पाटील सर उपस्थित होते. माजी विद्यार्थिनींकडून सभागृहाच्या प्रवेशद्वारात सर्व शिक्षकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्व सदस्यांना व आजी माजी शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे सहशिक्षक श्री के. एन. पाटील यांनी विद्यार्थिनीना सदिच्छा दिल्या. शाळेच्या माजी व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा आपटे यांनी भारतरत्न धोंडो केशव कर्वे व आद्य संचालिका बनूबाई अहो यांच्यावरील स्वरचित कवितेचे गायन केले. माजी शिक्षक श्री सुतार सर सौ.मत्तिकोप बाईंनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचलन प्रिया जाधव व अनुश्री कुलकर्णी यांनी केले तर आभार मिनाक्षी पाटील यांनी मानले. संपदा जोशी, हर्षदा पावशे, भाग्यश्री हुंदरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
महिला विद्यालय हायस्कूलच्या 2001-02 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
By Akshata Naik
![6353EAD8-ED2F-429D-9DC6-3919DE3F2C76](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2022/12/6353EAD8-ED2F-429D-9DC6-3919DE3F2C76-1068x600.jpeg)
Previous articleनिराश केले मसूरने ,दिलासा मोहरीने