महिला विद्यालय हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी उद् घाटन समारंभात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन श्री शिवाजीराव हंडे, महिला विद्यालय मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानदास कपाडिया, उपाध्यक्ष श्री मधुकर परांजपे, चेअरपर्सन डॉ. सौ. शोभा शानभागतसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला शाळेच्या चार गटांचे पथसंचलन झाले. यानंतर विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रीडा ध्वजरोहण करण्यात आले. कु. नेहा पोटे हिच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. शालेय विद्यार्थिनीकडून विविध साधनांसह शारीरिक कवायतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी सातवी आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांनींनी लाठीचे खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने करून दाखवले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीनी उत्कृष्टपणे लेझीम प्रकार सादर केले. त्याचबरोबर पिरॅमिड सारखा अत्यंत कठीण प्रकार ही शालेय विद्यार्थिनींनी मैदानावर सादर केला. मुख्याध्यापकांनी यावेळी पथसंचालनाचा निकाल जाहीर केला, मालती गटांने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त करताना महिला विद्यालय हायस्कूलची सांस्कृतिक परंपरा याचे कौतुक करत, विद्यार्थिनींना यशस्वी व्हा असा शुभ संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार सौ. नेहा भातकांडे यांनी मानले. कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षक श्री भरमा तुपारे यांनी मेहनत घेतली, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले
महिला विद्यालय हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
By Akshata Naik
Previous articleहिरकमहोत्सवी वर्षानिमित्त भरतेश मध्ये विविध कार्यक्रम
Next articleमकरसंक्रांत