भरतेशच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात बॉलिवूडचे ख्यातनाम गायक सचेत आणि परंपरा, तसेच कन्नड सुप्रसिद्ध अभिनेते चरण राज उपस्थित असणार असल्याची माहिती आज भरतेश एज्युकेशन ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर त्यांनी भरतेशच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली.
भरतेश अँड एज्युकेशन ट्रस्ट आपले साठावे वर्ष म्हणजे हीरक महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे दिनांक 17 जानेवारी ते 20 जानेवारी या दरम्यान पभरतेश कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
त्याचबरोबर भरतेश कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे बीबीए चा रजत महोत्सव देखील साजरा होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत भरतेश अँड एज्युकेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेस चेअरमन जीवेदत्त देसाई राजीव दोड्डण्णावर भूषण मिरज श्रीपाद खेमनापुरे सावित्री दोडन्नावर विनोद दोड्डन्नावर उपस्थित होते.