पत्रकार विकास अकादमीच्या वतीने रविवार दि. १५ रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी १०. ३० वाजता हा कार्यक्रम अकादमीच्या नेहरू नगर येथील कार्यालयात होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना अभिवादन आणि अकादमीच्या पुढील कार्यक्रमांची रूपरेषा यावेळी ठरविली जाणार आहे. पत्रकार सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी केले आहे.