महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.यावेळी
युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
तसेच नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले, आणि उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांनी अभिवादन करून मनोगत व्यक्त केले .
त्यानंतर त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीची आज युवकाना गरज आहे असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सचिन केळवेकर, विनायक कावळे, राजू कदम, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले.