एका असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात फाउंडेशन ने दिला आहे खानापूर येथील बुरुड गल्ली येथे एक वृद्ध महिला एकाच ठिकाणी किती दिवसांपासून बसून होती.
यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. यावेळी त्यांनी लागलीच वेळ न दडवता त्या वृद्ध महिलेला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यावेळी सदर महिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होताच तिच्यावर उपचार करण्यात आले. बरे झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रम मध्ये दाखल करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मिलन पवार प्रवीण मुतगेकर आकाश शहापूरकर प्रज्ञा शिंदे भारती बुडवी अवधूत तुडयेकर सायमन डिसोजा उपस्थित होते