विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शुद्ध पाणी पिता यावे याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी शहरातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 5 ला फाउंडेशनच्या वतीने जलशुद्धी उपकरणाचे वितरण केले आहे .
सरकारी शाळेमध्ये अनेक मुले शिक्षण घेण्यास करिता येत असतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिता यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले रहावे आहे या हेतूने त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे जलशुद्धीकरण उपकरण हस्तांतर केले.
यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिलन पवार, प्रज्ञा शिंदे, भारती बडवी, अवधूत तुडयेकर उपस्थित होते.